TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवू : डाॅ. सुदर्शन अय्यंगार !

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अहिंसा सद्भावना यात्रेत जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चुक झाली तर ती स्वीकारा, त्याबद्दल पश्चाताप करा आणि त्यात सुधारणा होण्याकरिता प्रायश्चित अवश्य करा, हे महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्वाचे सुत्र प्रत्येकाने अंगिकारावे. तन व मन स्वच्छ ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता शुद्ध आचारण ठेवून अहिंसा, शांतीतून समर्थ भारत घडवूया असा मोलाचा संदेश गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन केले होते. लाल बहादूर शास्त्री टॉवर येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन अहिंसा सद्भावना शांती यात्रेची सुरवात झाली. यावेळी डाॅ. सुदर्शन अय्यंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखविली. ही यात्रा नेहरू चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. हेडगेवार चौक – स्वातंत्र्य चौक मार्गे महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत डाॅ. सुदर्शन अय्यंगार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, दिल्ली विद्यापीठाचे पुलिन नायक, डाॅ. भरत अमळकर, माजी महापौर जयश्रीताई महाजन, ज्योती जैन, डाॅ. गीता धरमपाल आदी मान्यवर उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, डाॅ. शेखर रायसोनी, राजेंद्र मयूर, अनिश शहा, शिरीष बर्वे, अमर जैन, डाॅ. राजेश पाटील, उपायुक्त अविनाश गांगुर्डे, मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील, एजाज मलिक, विनोद देशमूख, दीपक सूर्यवंशी, विष्णु भंगाळे, शिवराम पाटील, प्रवीण पगारीया, शोभना जैन, निशा जैन, डाॅ. भावना जैन यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक शिक्षक, एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी, जैन उद्योग समूहातील सहकारी उपस्थित होते. अहिंसा सदभावना यात्रेचा समारोप महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन झाले. महात्मा गांधी उद्यानातील सभेची सुरुवात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आरंभी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो.. हे भजन म्हटले. यानंतर सर्वधर्म प्रार्थना झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अहिंसेची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

डाॅ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, महात्मा गांधीजी हे देशासाठी जगले म्हणून ते आजही स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या 78 वर्षाच्या आयुष्यात 178 उपवास केले. समाज, राष्ट्रासाठी उपवास करताना आपल्यापेक्षा लहानांनी चुक केली असेल तर ती पालक म्हणून स्वीकारली व त्याचे प्रायाश्चित केले. आपल्या आयुष्यातील अनमोल असे 8 वर्षे त्यांनी कारागृहात घालविली. आजही महात्मा गांधीजींचे विचार, मुल्ये यावर आचरण केले जाते याबाबत गोष्टी स्वरूपात डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चुक ही व्यक्ती, परिवार, समाजात आर्थिक व्यवहारात, राजनैतिक व्यवहारात यासह कुठल्याही क्षेत्रात होऊ शकते. ती लहान असो किंवा मोठी असो त्याचे परिमार्जन हे स्विकृती, पश्चाताप आणि त्याचे प्रायश्चीत या तिनही गोष्टी केल्यानेच मनुष्याच्या चरित्र्यात सुधारणा होईल. यातून व्यक्तीमत्व घडेल आणि राजकिय नेतृत्त्व चारित्र्य संपन्न होईल असा संदेशही डाॅ. सुदर्शन अय्यंगार यांनी दिला.

या शाळांचा सहभाग

यात्रेमध्ये आनंदीबाई जोशी, जिजामाता, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू, स्वामी विवेकानंद, सानेगुरुजी, भगतसिंग, डाॅ. ए. पी. जे अब्दुल कलाम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. विदेशी विद्यार्थीही सहभागी होते. बैलगाडीवर चरखा सूतकताई हे आकर्षण ठरले होते. यात्रेत पुष्पावती गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालय, नंदिनीबाई माध्यमिक विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीअम स्कूल, के के उर्दू हायस्कूल, ए टी झांबरे विद्यालय, सेंट टेरेसा इंग्लिश मिडीअम, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, अनुभूती निवासी स्कूल, यादव देवचंद पाटील, हरिजन छात्रालय या शाळांसह जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक व खेळाडूंसह यात्रेत सहभाग घेतला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
Next Post

नार पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात व वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणेपर्यंत आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार : आमदार मंगेश चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव घरकूल घोटाळा : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मंजूर !

November 30, 2022

बी.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हर्षदा हीचा भव्य सत्कार

October 31, 2021

‘…त्यामुळे अपघात अटळ आहे’ ; फडणवीसांची सभा संपताच राऊतांचं ट्वीट

May 16, 2022

जळगावचा अर्चित पाटीलला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group