धरणगाव (प्रतिनिधी) रेल्वेत नौकरीला लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील एका तरुणाची १३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव शहरातील पिल्लू मशीद जवळ मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ (वय २७ ), हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सतिश गोकुळ पाटील, मनिषा सतिष पाटील, प्रमिला गोकुळ पाटील सर्व (रा. जुनोवणे ता. अमळनेर जि. जळगाव), प्रविण गोकुळ महाले (रा. पारोळा), राम नारायण नेवाळकर, अरुण (पुर्ण नाव माहीत नाही) दोन्ही (रा नाशिक) तसेच रामकुमार (पुर्ण नाव माहीत नाही (रा. दिल्ली) या सर्वांनी संगनमत करून मोहंमद जुबेर यांना भारतीय रेल्वे खात्यात नोकरी लावुन देतो, असे खोटे अमिष दाखवले. एवढेच नव्हे तर मोहंमद जुबेर यांच्या नावाचे खोटे बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे बनावट शिक्के मारुन RRCB इंडियन रेल्वे, असा खोटा बनावट ई-मेल मोहंमद यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोहंमद जुबेर यांच्याकडून तब्बल वेळोवेळी एकूण १३ लाख रुपये घेतले.
परंतु आपल्याला कोणतीही नोकरी लावुन दिली नाही व पैसे परत केले नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहंमद जुबेर यांनी धरणगाव पोलिसात धाव घेतली. तसेच संशयित आरोपीतांना त्यांच्या बैंक खात्यात पैसे भरण्याच्या पावत्या, संशयितांना पैसे दिल्याचे फोटो तसेच आरोपीतांनी फिर्यादीस रेल्वेच्या नावाचे खोटे बनावट तयार केलेले ऑडर प्रत व इतर कागदपत्रही पोलिसात सादर केलीत. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुधिर चौधरी हे करीत आहेत.