धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उड्डान पुलाच्या बाजुला असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खाली रोडावर लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटन उघडकीस आली आहे.
याबाबत ज्ञानेश्वर गंभीर पाटील (रा. पष्टाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २३ सप्टेंबर रोजी ते धरणगाव शहरातील उड्डान पुलाच्या बाजुला असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कामानिमित्त आले होते. बँकेजवळ रोडावर दुचाकी (एम.एच.क्र.१९ ए.डब्ल्यू.८०७४) लावली होती. या दुचाकीला अंजनविहीरे विकास सोसायटीचे दप्तर असलेली पिवशीत लावलेली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकीसोबत रजिस्टर देखील लंपास केले आहे. याप्रकरणी पो. ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत.