धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपरिषदतर्फे शहरातील संकलित होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते. या कंपोस्ट खतास शासनाकडून “हरित- महासिटी कंपोस्ट “मानांकन प्राप्त झालेले आहे.
सदरचे मानांकन कंपोस्ट खताच्य विपणन व विक्रीसाठी असेल.यासाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, निलेश वाणी यांच्यासह सर्व कचरा संकलन व प्रक्रिया करणारे कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.