धरणगाव (प्रतिनिधी) शहरात नगरोत्थान (राज्यस्तर) अभियान अंतर्गत शहरात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली असून त्यावर नवीन नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. तथापि शहरातील जुनी पोलिस लाईन संजयनगर येथील धान्य गोडाऊन परिसरात आज दि. १४ एप्रिल २०२५ रोजी धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम राबविली जात आहे.
याठिकाणी नविन जलवाहिनीवर सहा अनधिकृत नळकनेक्शन आढळून आलेत. यामध्ये मोहम्मद इकबाल मो. फहीज, तौकिर अली रियाजअली सैय्यद, शहेनाज बानो मोहम्मद सादिक शेख, मोहम्मद साजिद फैज मोहम्मद शेख, कामरान नुरोद्दीन शेख, मोहम्मद अयाज मोहम्मद सिद्दीक या अनधिकृत नळ धारकांवर दंडात्मक कारवाई करून नळ कनेक्शन फी व इतर चार्जेसची दुपटीने आकारणी करून संबंधितांकडून रक्कम रु. ७२००० /- इतकी वसुली करण्यात आली व सदरचे अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यात आले. तसेच नय्यर अली सैय्यद यांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करून फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
सदर मोहीमेत कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, कर निरीक्षक हितेश जोगी, विद्युत अभियंता राहुल तळेले यांच्या टीम मार्फत धडक कारवाई करण्यात आली. या प्रसंगी धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले, सहा. पोलिस निरीक्षक संतोष पवार तसेच पोलिस कर्मचारी राहुल बोरसे, होमगार्ड दिनकर मोरे, शिवाजी वाघ, गणेश सावंत यांचे सहकार्य लाभले.
या मोहिमेत नगरपरिषदेचे कर्मचारी अनिल पाटील, केशव पैठणकर, राजेश संगपाळ, किशोर खैरनार,राजेंद्र माळी, गणेश पाटील, सिकंदर पारधी, शिरीष पाटील, संभाजी पवार, श्री विक्रांत चौधरी , श्री निलेश वाणी, आबिद मेहतर, जुबेर शेख, मोहनीस शेख, सुरेश चौधरी, प्रशांत चौधरी, वसंत चव्हाण, युवराज चौधरी, विशाल बन्सी व इतर नगरपरिषद कर्मचारी सहभागी होते.