धरणगाव (प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदू भाविकांच्या झालेल्या हत्येचा धरणगाव येथील मुस्लिम समाजाने तीव्र निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील जबाबदार नागरिकांनी तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करून अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या अमानवी हल्ल्यात २६ हिंदू भाविक शहीद झाले असून, हे कृत्य अत्यंत निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी आणि देशातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी दहशतवाद्यांना तातडीने पकडून कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या कोणत्याही शक्तींवरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन हाजी इरफान हाजी अरमान शेख (धरणगाव मुस्लिम समाज अध्यक्ष), हाजी रफीक कुरैशी (उपाध्यक्ष), अहमद पठान (माजी नगरसेवक), सगीर अहमद ख़ाटीक, करीम खान, तौसीफ पटेल, नदीम काझी, वसीम पिंजारी, वसीम कुरैशी, जमशेर खान बेलदार, शोएब बागवान, शेख निजामोद्दीन बेलदार, मुत्तलिब मोमिन यांच्यासह अनेक जबाबदार नागरिकांनी सह्यांसह सादर केले.