TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तंत्रज्ञानातून शेतीला बळ मिळते!

जैन हिल्सला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कुठलाही उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी कृषी क्षेत्र महत्त्वाचे आहे. शेतमाऊली एका दाणाचे हजार दाणे देत असते त्यामुळे रोजगाराची निर्मितीसुद्धा यातून होते. शेत, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली तर खऱ्या अर्थाने शेतकरी पोशिंदा ठरेल यासाठी फाली च्या माध्यमातून देशाच्या भविष्याची गुंतवणूक आपल्या माध्यमातून समृद्ध होत आहे. एआय चा वापर, ऑटोमेशन, ड्रोन चा वापर यासह तंत्रज्ञानामुळे शेतीला बळ मिळते.

‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्याची आज जैन हिल्सला सुरवात झाली. क्षेत्रभेटीनंतर शेतीविषयी सुसंवादात शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चासत्रात स्वप्नील चौधरी-नाचनखेडा, निरज चौधरी- दापोरा बु-हाणपूर, लोकेश रोटे-नशिराबाद, दीपक अरूण पाटील, सोनाळा-जामनेर,कल्पेश पाटील-नशिराबाद
या शेतकऱ्यांनी संवाद साधला.

केळी, हळद, कापूस, डाळिंब, तुर, टरबूज, जैन स्विट ऑरेंज, मोसंबी, लिंबू, हरभरा उत्पादनातील बारकावे शेतक-यांनी सांगितले. सौलर योजनेसह टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळीच्या नफ्याचे गणिते, निर्यातक्षम उत्पादनासाठी जागतिक मानांकनासह शेती करण्याच्या पद्धती, तरूणांनी शेतीमध्ये करावयाचे बदल, फ्रुटकेअर, प्रकिया उद्योग यासह अन्य प्रश्नांवर शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी चर्चा केली. पुर्वा खरात, सायली बांगे, जय गवांडे, भक्ती देवकर, पुष्पक शिवांकर, सानिका बोडके या फाली विद्यार्थ्यांनी लीड केले.

शेतीतून जास्त उत्पादन वाढीसाठी पाच घटक महत्वाचे आहे. माती, पाणी, सूर्यप्रकाश, कीड नियंत्रण, तण नियंत्रण यावर शेती अवलंबून असते. यातील जमीनीची सुपिकता महत्त्वाची आहे फक्त रासायनिक किंवा जैविक खतांचा वापर न करता त्याचे संतुलन ठेवले पाहिजे. नोकरी पेक्षा शेती तुन जास्त उत्पादन होते. पिकानुसार, आवश्यकतेनुसार खत, पाणी दिले पाहिजे जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल परिणामी अधिक नफा होईल. रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

दुसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस

फाली उपक्रमात दुसऱ्या टप्प्यात ४०० विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.

अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा

दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे राऊंट राबिन गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील, डॉ. पंचभाई, डॉ. सुब्रमण्यम, डॉ. कल्याणी मोहरीर हे तसेच संजीव भेस्त (आयटी सी), सचिन शर्मा (प्रोमेप्ट), सनचेत जैन ( अग्रीबाजार), रितेश सुतेरा (प्रोम्पट डेअरी), डॉ. समीर मुधुली, निखील सोनडे (गोदरेज), कपिल रेनवा (स्टार अग्री) त्याच प्रमाणे चोपडा तालुक्यातील धानोरा येथील प्रगतशील शेतकरी अशोक देविदास महाजन, स्वप्नील व्यास (चोपडा) सहभागी झाले होते.

आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण

फाली-११ मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
Next Post

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता !

December 3, 2021

फोर्ब्सनं आशिया खंडातील १०० डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली ; स्टार्समध्ये अक्षय कुमारला स्थान

December 18, 2020

लाईनमन : वीज वितरण व्यवस्थेचा कणा !

March 4, 2023

काय सांगता ! हिमालयात सापडली कोरोनाला संपवणारी ‘संजीवनी’

January 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group