
धरणगाव (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पवार साहेबांच्या दौऱ्याविषयीची नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत नाथाभाऊंच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका वाटप तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली. लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या ३० तारखेला होणाऱ्या “अमृत महोत्सव कार्यक्रमाला” पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब येणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी, संघटनात्मक भूमिका तसेच नाथाभाऊंच्या वाढदिवसाला सदिच्छा भेट असे साहेबांचे नियोजन असेल. आजच्या बैठकीत नाथाभाऊंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देणे तसेच संघटनात्मक बांधणी याबद्दल जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमृत महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिका सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. तसेच काही पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक पदांवर जिल्हाध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
🔹यांच्या झाल्या नियुक्त्या…
१) नारायण चौधरी — किसान सेल तालुकाध्यक्ष
२) दिपक झुंजारराव — शहर उपाध्यक्ष
३) रविंद्र महाजन — सोशल मीडिया प्रमुख
४) पठाण साहिल खान — विद्यार्थी तालुकाध्यक्ष
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, कार्याध्यक्ष रविंद्र वाघ, जेष्ठ पदाधिकारी भगवान शिंदे, अशोक झुंजारराव, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष खलील (बंटी) खान, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मोहीत पवार, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, कार्याध्यक्ष सागर महाले, उपाध्यक्ष समाधान (बालाजी) महाजन, संघटक प्रफुल पवार आदी उपस्थित होते.
















