धरणगाव (प्रतिनिधी) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरींसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोहेकॉ मिलिंद सोनार यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, १) गुलाबराव रतन वाघ, २) निलेश सुरेश चौधरी, ३) भागवत भगवान चौधरी, ४) अँड. शरद माळी, ५)राजेंद्र पुंडलीक ठाकरे, ६) विजय माधवराव पाटील, ७) विलास परशुराम वाघ, ८) महेद्र भास्कर चौधरी, ९) भरत भगवाण महाजन, १०) गणेश मराठे १९) राहुल रघुनाथ महाजन, १२) बापु चावदस महाजन (सर्व रा. धरणगाव) १३) माधव राजधर सर्यवंशी (रा. साकरे) यांच्यासह इतर ७ ते ८ जणांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत पोलीस स्टेशनची कोणतीही परवाणगी न घेता गैरकायदेशीर मंडळी जमवून जळगाव जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लघन कलम १३५ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतांना वरील नमुद सर्वांनी सदर आदेशाचा भंग करुन मंत्री महोदय यांच्या दौरा कार्यक्रमात गदारोळ निर्माण केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.