धरणगाव (प्रतिनिधी) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे ‘शिव संवाद’ यात्रेसाठी धरणगाव नगरीत आगमन होणार आहे. यासंदर्भात आयोजित बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आदित्य साहेब ठाकरे यांचा दौरा आपल्या सर्वांना नवीन उर्जा देणारा ठरणार आहे. त्यामुळे हा दौरा ऐतिहासिक असा झाला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह आजी व माजी नगरसेवक, शिवसेना शाखा पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, अल्पसंख्यांक सेना, व्यापारी सेना, व शाखा प्रमुख, शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















