धरणगाव (प्रतिनिधी) सुबक रंगकाम करून शहर सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय एकनाथ माळी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
संजय एकनाथ माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगावातील नगरपालिकेसमोरील पुलाला व तसेच रस्त्याकडेच्या भिंती व महात्मा गांधी उद्यान याला रंग काम करण्यात यावे. तसेच त्यावर सुविचार, सुभाषिते, घोषवाक्य लिहिण्यात यावी, जसे पुणे शहरात रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी रंगकाम केले आहे, त्याच प्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे रंग काम करण्यात यावे, जेणेकरून धरणगाव शहर हे स्वच्छ सुंदर व आदर्श गाव म्हटले जाईल.
दरम्यान, निवेदनाच्या प्रती जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी, धरणगाव तहसीलदार नितीन देवरे, धरणगाव मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी देण्यात आल्या आहेत.