धरणगाव (प्रतिनिधी) “संविधान रक्षक दल भीम आर्मी” महाराष्ट्र राज्य प्रमुख रामकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य सचिव सुपडू संदानशिव यांच्या साथीने व जळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांच्या सूचनेनुसार धरणगाव तालुका धरणगाव येथे, ‘संविधान रक्षक दल’ भिम आर्मी या सामाजिक संघटनेचा कार्यकारणी सोहळा व मार्गदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला.
सदर मेळाव्याची महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. सदर प्रसंगी राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी सूत्रसंचालन केले व महाराष्ट्र राज्य प्रमुख रामकांत तायडे व जळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी “भीम आर्मी” जळगाव जिल्हा युनिटची आजवरची वाटचाल आपल्या भाषणातून विशद केली. त्यानंतर साळवा तालुका धरणगाव, येथे भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे जळगाव जिल्हा युनिट निघाले. त्या ठिकाणी जावून सम्राट अशोक बुद्ध विहार साळवा येथे बुद्धांच्या प्रतीमेस व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करण्यात आले. तदनंतर साळवा गावात भारतीय संविधान चौकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस गावातील बघिणी व बाल गोपाल उपस्थित होते.
सदर मेळाव्याप्रसंगी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख रमाकांत जी तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव, जळगाव जिल्हाअध्यक्ष श्रीकांत वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम प्रधान,जिल्हा संघटक डॉलीभाऊ वानखेडे, जिल्हा सचिव राजू इंगळे, मंगल गायकवाड, डॉ.योगेश भालेराव, तसेच अजय अहिरे, निखिल पवार, परेश अहिरे, सचिन अहिरे, जयेश अहिरे, गौतम देवरे, शंतनु ररकर, वैभव सपकाळे, मयुर सोनवणे, आदित्य पवार, निखिल पवार, त्याच बरोबर धरणगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
भीम आर्मी संविधान रक्षक दल धरणगाव तालुका युनिट मधील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नावे खालीलप्रमाणे
१) तालुका अध्यक्ष :- प्रशांत शिंदे/रोटवद
२) तालुका उपाध्यक्ष :- जयेश अहिरे/साळवा
३) प्रचार-प्रसिद्ध प्रमुख :- देवेंद्र शिंदे/रोटवद
४) तालुका उपाध्यक्ष२ :- शेखर साळुंके/गंगापूरी
५) सचिव :- गोरख थोरात/साळवा
६) मुख्य संघटक :- अजय सोनवणे/बांभोरी
७) संघटक :- परेश अहिरे/साळवा
८) मुख्य सचिव :- प्रविन शिंदे/भोणे.