धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे खु. गावी शेतकऱ्याचा हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्कीटमुळे शेतातील काढलेला २५ हजाराचा मका खाक जाळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
या संदर्भात अधिक असे की, ज्ञानेश्वर नारायण पाटील (वय, ७५ रा.) यांची हिंगोणे खु. शिवारात शेती आहे. दि. १६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास MSEB चे ईलेक्ट्रीक पोल वरील तारांचा ईलेक्ट्रीक शॉटसर्कीट होवुन त्यातून आगीची ठिणगी पडली. त्यामुळे शेत गट नं १८६ / ४ मधील मक्का पिकास आग लागून सुमोर २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे हा मका ज्ञानेश्वर पाटील यांनी कापून काढून ठेवलेला होता. परंतू आग लागल्यामुळे शेतकऱ्याचा हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद झाली असून पुढील तपास पो.ना. दिपक पाटील हे करीत आहेत.