जळगाव (प्रतिनिधी) शेत जमिनीच्या नोंदीत फेरफार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरींसह चौघांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
जयंत पुंडलिक भट्ट (महसूल, नायब तहसील) यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेत जमिनीत फेरफार केल्याप्रकरणी भरतसिंग देविदास परदेशी (नशिक), निलेश सुरेश चौधरी (माजी नगराध्यक्ष, धरणगाव), वनराज बुधा पाटील (तत्कलीन मंडळ अधिकारी,साळवा), रोशनी मोरे (तत्कालीन तलाठी नांदेड), दत्तात्रय चौधरी (मुद्रांक विक्रेता, धरणगाव ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात चौघांचा अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे. संशयितांतर्फे अॅड.व्हि.आर.ढाके यांनी कामकाज बघितले. चौघांना १५ हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून सर्वांना पोलिसात हजेरी लावण्याची अट कोर्टाने घातली आहे.
















