धुळे (वृत्तसंस्था) राज्यात थंडीचा कडाका वाढला असून धुळ्यात ६.८ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुन्हा थंडी वाढली असून ढगाळ वातावरण व गार वारे वाहत आहेत.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच गार वारे वाहत असल्याने हवेतील गारठा अधिकच वाढला आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना पुन्हा स्वेटर, टोपी अशा गरम कपड्यांचा वापर करून शरीराचे संरक्षण करावा लागत आहे. तसेच शेकोटीचा देखील आधार नागरिकांना शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी करावा लागत आहे. थंडीचा कडाका वाढला असून कालच्या तुलनेत अचानक तापमानात ५ अंशाने घट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना अचानक वाढ झालेल्या थंडीचा सामना करावा लागत आहे.