जळगाव (प्रतिनिधी) शहरात प्रथमच केशराई हॉल आणि पुण्यातील प्रख्यात सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन व हेल्थझिया हेल्थकेअर कंपनी यांच्या संयुक्तविद्यमाने भव्य दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पदमश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सुदाम काटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती केशराई हॉलचे संचालक संदीप अहिरे यांनी दिली आहेत.
जळगावात प्रथमच सिकल सेल आजारावर भव्य शिबीर
जळगाव शहरात प्रथमच सिकल सेल आजारावर निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत होणार आहे तर दिनांक १३ एप्रिल रोजी दोन सत्रात सकाळी ११ ते १ व संध्याकाळी २ते ७ या वेळेत २ तासाच्या उपचारासहीत पोश्चरल थेरपी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरासाठी नोंदणी आवश्यक
शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगर येथिल केशराई हॉल येथे दोन दिवसीय आरोग्य शिबीर व कार्यशाळेचा कार्यक्रम होणार असून शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्यासाठी नावं नोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी आयोजकांनी मो.9371255002/3 तसेच 7378975468 या क्रमांकावर संपर्क करून नावं नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
विनामूल्य सेवा शिबीर
पुण्यातील सुप्रसिद्ध आणि अद्वितीय असलेली हेल्थझीया हेल्थकेअर संस्था असून जळगाव मध्ये पहिल्यांदाच मोफत कार्यशाळा आयोजित करत आहे.विनाऔषधी आणि शास्त्रक्रियाविराहित उपचारांनी आपल्या वेदनांपासून रुग्णांना आराम मिळवण्यासाठी आयोजन केले आहे. तरि रुग्णांनी या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीप अहिरे यांनी केले आहे.