एरंडोल (प्रतिनिधी) नाशिक पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने शहरातील जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड टाकत दहा जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाहून एक लाख रुपयाच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास एरंडोल शहरानजीक असलेल्या एका लिंबूच्या बागेत या कारवाईचे सत्र पार पडले. त्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील मुरलीधर पाटील, मच्छिंद्र नारायण महाजन, सुनील नाना पाटील, रफीक खान याकूब खान, पंढरी खुशाल पाटील, शांताराम राजाराम महाजन, अमित लक्ष्मण परदेशी, गुलाब महादू पाटील, सिद्धार्थ हिम्मत सिंग परदेशी, राजेश मोतीराम पाटील यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पकडण्यात आलेल्या दहा जणांच्या ताब्यातून एक लाख रुपये रोख, दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.