TheClearNews.Com
Wednesday, February 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चंद्रपुरात सापडलेली गोलाकार वस्तूचं डायरेक्ट चायनिज कनेक्शन ; जाणून घ्या..सविस्तर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात लोखंडी रिंग पडली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंतच्या आकाशात दिसलेले अग्निलोळ हे चीनच्या ‘चँग झेंग ३ बी’ या रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाशात दिसलेल्या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत जमिनीवर सापडलेले अवशेष रॅकेटचा तिसरा टप्पा आणि चिनी रॉकेटच्या क्रायोजिनिक इंजिनाचे भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विविध कृत्रिम उपग्रह आणि रॉकेटचे अवशेष अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात कधी प्रवेश करतील याबाबत सोशल मीडियावर माहिती देणारे अभ्यासक जोसेफ रॅमिस यांनी शुक्रवारीच चिनी रॉकेटच्या वातावरणातील प्रवेशा बाबत अंदाज जाहीर केला होता. या अंदाजानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्री सात वाजून ३२ मिनिटांनी चिनी रॉकेटचा वातावरण प्रवेश अपेक्षित होता.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

प्रत्यक्षात या अंदाजापेक्षा दहा मिनिटे उशिरा म्हणजे सात वाजून ४२ मिनिटांनी चिनी रॉकेटच्या अवशेषांनी आफ्रिकेच्यावर वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर वातावरणातून जमिनीच्या दिशेने येताना अवशेष भारतात सर्वप्रथम सुरत येथे पाहिले गेले. त्यानंतर वायव्येकडून आग्नेय दिशेने अवशेषांचा प्रवास सुरू असताना मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणांहून चिनी रॉकेटच्या जळत्या अवशेषांचे दर्शन घडले.

या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत नागरिकांना जमिनीवर धातूची वर्तुळाकार कडी आणि गोलाकार भाग सापडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्राच्या आकाशात दिसलेली घटना आणि जमिनीवर सापडलेले अवशेष हे चार फेब्रुवारी २०२१ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या चिनी रॉकेट ‘चँग झेंग ३ बी’ या लाँग मार्च श्रेणीतील रॉकेटचे असल्याचे स्पष्ट आहे. भूस्थिर उपग्रहांना अवकाशात सोडण्यासाठी या रॉकेटचा वापर केला जातो.’

‘उपग्रह अवकाशात मुक्त केल्यानंतर तीन मीटर व्यास आणि १२ मीटर लांबी असलेला रॉकेटचा तिसरा टप्पा पृथ्वीभोवती काही काळ फिरत राहतो. कालांतराने त्या अवशेषांच्या कक्षेचा ऱ्हास होऊन ते वातावरणात प्रवेश करतात. चँग झेंग रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजिनिक इंजिनचा समावेश असतो. ज्यामध्ये द्रवरूप हायड्रोजन इंधन म्हणून; तर द्रवरूप ऑक्सिजन ऑक्सिडायझर म्हणून वापरण्यात येतो. या दोन्ही घटकांच्या टाक्यांपासून ते इंजिन आणि तिसऱ्या टप्प्याचे कवच असे सर्व भाग शनिवारी वातावरणातून जमिनीकडे येताना घर्षणामुळे जळत आले. जमिनीवर सापडलेल्या कडीचा व्यास, इंजिनाचे भाग चिनी रॉकेटचे असल्याचेच सिद्ध करतात,’ असेही सूत्रांनी सांगितले.

अवकाशातून काल पडलेला तो तुकडा चायनीज रॉकेटचा
चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अवकाशात प्रवाही लाल गोळे दिसल्याने हा प्रकार काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी त्यांच्या भागातील व्हीडीओ सोशल मीडिया शेयर केले आहेत. आता नासा मधील विज्ञान अभ्यासक लीना बोकील यांनी काल जे अवकाशातून पडलं ते चायनीज रॉकेट किंवा सॅटॅलाइट चा एखादा भाग असू शकतो असा दावा केला आहे.

भविष्यात अशा घटना वाढणार
पृथ्वीनजीकच्या कक्षेत फिरणारे रॉकेट आणि उपग्रहांचे सर्व निकामी आणि अनियंत्रित अवशेष वातावरणात प्रवेश करून घर्षणाने नष्ट होतात. त्यांचे काही भाग पूर्णपणे न जळता खाली आले तरी त्यांपैकी बहुतांश भाग समुद्रात कोसळतात. क्वचित प्रसंगी ते जमिनीवर आणि त्यातही मानवी वस्तीवर कोसळण्याची उदाहरणे सापडतात. मात्र, अवकाशातील कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणासोबत मानवी वस्तीवर हे अवशेष कोसळण्याची शक्यताही वाढत जाणार असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अशा अवशेषांमुळे कोणाचे नुकसान झाल्यास ज्या देशाच्या किंवा कंपनीच्या मालकीचे ते अवशेष आहेत, त्यांनी ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याची तरतूद आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आहे.

केंद्र सरकारनं गंभीर दखल घेण्याची गरज
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पडलेले आगीचे गोळे हे चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचंही काही तज्ज्ञांनी म्हटलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये चीननं ”चँग झेंग 3 बी” या नावाचं रॉकेट प्रक्षेपित केलं होतं आणि चीनच्या याच रॉकेटचे अवशेष महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पडल्याचा अंदाज आहे. चीनच्या रॉकेटचे डेब्रीस भारतातील मध्यवर्ती राज्यांमध्ये पडलं. या घटनेत जीवितहानी झालेली नसली तर केंद्र सरकरानं या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं बोललं जातंय.

उल्कापात म्हणजे नक्की काय?
उल्का म्हणजे अवकाशातील खडक होय. हा खडक जेव्हा पृथ्वीच्या दिशेने अतिशय वेगाने प्रवास करत असतो त्यावेळी घर्षणाने खडक प्रकाशमान होतो. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर गुरुत्वाकर्षणाने हा खडक खेचला जातो आणि त्यानंतर अतिशय वेगाने या खडकाचा प्रवास भूपृष्ठाकडे सुरु होतो.काही उल्का या आकाशातच नष्ट होतात.अशाच एका उल्कापातामुळे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची निर्मिती झालीय. सुमार 52 हजार वर्षांपूर्वी 2 दशलक्ष टन वजनाची उल्का जमिनीवर आदळली आणि त्यातूनच लोणार सरोवराची निर्मिती झालीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

राजस्थानमध्ये धार्मिक संघर्ष ; १२ जणांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोस्ट ऑफिस योजना : महिन्याला 1500 रुपये जमा करा, मिळतील 35 लाख रुपये ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती

March 19, 2022

जिल्ह्यात आज आढळले ८३ कोरोनाबाधित, ३७४ झाले बरे !

February 5, 2022

‘वंचित’ ची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा : अॅड. प्रकाश आंबेडकर !

July 17, 2024

जयश्रीताईंच्या हाताला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी बांधली मोट; शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला मोठा प्रतिसाद !

November 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group