पुणे (वृत्तसंस्था) इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एका तरुणाने २० वर्षाच्या तरुणीवर कोल्ड्रिंग मध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape In Pune) केला. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुजरातमध्ये राहणाऱ्या मितुल दिलीप परमार (Mitul Dilip Parmar) याच्या विरुद्ध आयपीसी IPC 376, 376/2एन, 366 सह पोक्सो अॅक्ट आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 22) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च 2018 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत पुण्यात आणि आरोपीच्या गुजरात येथील घरात घडला आहे. पीडीत तरुणीच्या तक्रारीवरून मितुल परमार (वय-25 रा. गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी आणि आरोपीची ओळख इंन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झाली. आरोपीने तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तिला कोल्डिंग मधून गुंगीचे औषध दिले. तरुणी बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करुन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढले.
यानंतर त्याने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्याच्या उद्देशाने गुजरातला बोलावून घेतले. आरोपीने पीडित तरुणी सोबत लग्न करुन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकवेळा शरीर संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक करीत आहेत.