जळगाव प्रतिनिधी । आज जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावरती महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे आले असता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये विद्यापीठाची आढावा बैठकीसाठी जाण्याच्या अगोदर जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या फार्म हाऊस वरती भेट घेऊन विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची व विद्यापीठांमधील संघशाहीपणाची व लवकरात लवकर विद्यापीठ संघमुक्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याकडे एन एस यू आय ने केल्या खालील मागण्या –
1) संघ प्रचारक राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.
2) तक्रार निवारण समितीचे चेअरमन न्यायमूर्ती श्री व्यवहारे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा का दिला..? याची चौकशी व्हावी.
3) वित्त अधिकारी श्री कराड यांना विद्यापीठाने अचानक का काढून टाकले..? याची सखोल चौकशी व्हावी..
4) विद्यापीठाने कुठलीही निविदा न काढता एक कोटीचे बीएसएनएल टेंडर यामधील सत्यता व लपलेल गुढ नेमकं काय आहे..? याबाबतची चौकशी व्हावी..
5) कुलसचिव वित्त अधिकारी व अभ्यास मंडळावरील इतर नियुक्त्या तात्काळ करण्यात यावे.
6) विद्यापीठातील नोकर भरती गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.
7) कुलसचिव बी बी पाटील यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती का घेतली..? याची चौकशी करण्यात यावी..
मंत्रीमहोदयांनी तब्बल 15 मिनिटे श्री मराठे यांच्याकडून जाणून घेतली विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची परिस्थिती
पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या पाळधी येथील फार्महाऊसवरती जळगाव जिल्हा एन एस यु आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी नामदार उदयजी सामंत यांची भेट घेऊन विद्यापीठ प्रशासनाचा सुरू असलेल्या भोंगळ कारभार व गैरव्यवहार याची सखोल माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची वेळोवेळी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल मंत्रीमहोदयांनी तात्काळ समजून घेऊन जिल्हाध्यक्ष श्री मराठे यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा करून विद्यापीठातील संपूर्ण भोंगळ कारभाराची परिस्थिती जाणून घेतली.
पुढील आठवड्यात मला मुंबईला भेटण्यास या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना भेटीदरम्यान सांगितले
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय जी सामंत यांच्याशी विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभार याविषयी केलेल्या चर्चेदरम्यान संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाची परिस्थिती समजावून घेतल्यानंतर आढावा बैठकीमध्ये विद्यापीठाला या संपूर्ण प्रकाराबद्दल जाब विचारला जाईल व आपण पुढील आठवड्यामध्ये मला मुंबई येथे भेटण्यास यावे यासंबंधीचे आश्वासन आमदार उदय सामंत यांनी जिल्हाध्यक्ष श्री मराठे यांना दिले.
याप्रसंगी एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे, माजी सिनेट सदस्य अतुल कदमबांडे, राष्ट्रवादी महानगर सचिव कुणाल पवार, राष्ट्रवादी फार्मसी विद्यार्थी संघटना अध्यक्ष भूषण भदाने, विद्यार्थी सेना प्रमुख अंकित कासार आदी पदाधिकारी उपस्थित होते