पारोळा (प्रतिनिधी) शेतातील विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात ४५ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात दत्तू काळे सांगळे व राहुल दत्तू सांगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी राहुल दत्तू सांगळे याला अटक करण्यात आली आहे.
बापू काळे सांगळे (वय ५५, रा. शेळावे खु ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बापू काळे सांगळे व दत्तू काळे सांगळे (वय ४५) हे सख्खे भाऊ असून दत्तू याने विहीरीच्या पाणी भरण्याचे कारणावरून बापू यांच्याशी वाद घातला. तसेच राहुल दत्तू सांगळे (वय २२) याला फोन लावून बोलाऊन घेत राहुल याने त्याची टाटा कंपनीचे इंट्रा वी (१० क्र एम एच १९ सी वाय ८१८३) हि भरधाव वेगात चालवत रोडवर उभे असलेल्या लोकांच्या अंगावर गाडी चालवून बापू यांची पत्नी अलकाबाई बापु सांगळे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. तसेच विद्या महेंद्र सांगळे, मनिषा दत्तु सांगळे, अविनाश प्रभाकर सांगळे (सर्व रा शेळावे खु ता पारोळा) यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात दत्तू काळे सांगळे व राहुल दत्तू सांगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राहुल दत्तू सांगळे याला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव हे करीत आहेत.