कल्याण (वृत्तसंस्था) घराच्या बाल्कनीमुळं दोन कुटुंबात फ्री-स्टाइल हाणामारी झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील बारावे येथे घडली आहे. ज्यावेळी वाद झाला त्यावेळी हा वाद सीसीटिव्हीमध्ये कैद केला आहे. झालेल्या वादाची तक्रार कल्याण येथील खडकपाडा पोलिस (Khadakpada police) स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.
व्हिडीओत सुरूवातीला एका घराच्या दरवाज्याजवळ दोन महिलांनी एका महिलेवरती हल्ला केला. त्यावेळी त्या घरातून एक लाल रंगाचा शर्ट घातलेला पुरूष देखील बाहेर आला आहे. परंतु एका महिलेला त्या महिला मारहाण करत रस्त्यावर खेचत आहेत. तसेच त्यावेळी अनेक महिला जमा होताना व्हिडीओत दिसत आहेत. महिला एकामेकींच्या केसाला पकडून मारहाण करीत आहेत. भांडण सुरू असताना एक कुत्रा त्यांच्याबाजूने गिरट्या घालत आहे. दोन महिलांनी एका महिलेला चक्क बॅटने मारहाण केली आहे. मारू दे…मारू दे…मी त्यांची आता बरोबर वाट लावतो असं एक पुरूष व्हिडीओत बोलत आहे…महिलेला रस्त्यात आडवी पाडून मारहाण केली आहे. याबाबत खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. संबंधित तक्रारदाराने हा व्हिडीओ सुध्दा पोलिसांच्या दिला आहे. त्यामुळे नेमका वाद कशामुळे झाला. मारहाण केलेल्या महिला कोण होत्या. या सगळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.