चोपडा (प्रतिनिधी) येथील कमला नेहरू आदिवासी वस्तीगृहातील मुलींना दिवाळी निमित्त भारतीय जैन संघटनातर्फे नविन कपडे वाटप करण्यात आले.
भारतीय जैन संघटनाने आदिवासी मुलींना कपडे वाटप करायचे आहेत, असे आवाहन केले तेव्हा पदमावती कलेक्शन, मनिष कलेक्शन, आस्था कलेक्शन, अंबर रेडिमेड अश्या विविध दुकानावरून मुलींचे ड्रेस देऊन भारतीय जैन संघटनेला मदत केली. यानंतर भारतीय जैन संघटनाने आदिवासी मुलींना दिवाळी निमित्त नवीन कपडे वाटप करण्यात आले.
दरवर्षी संघटना कडून शालेय साहित्य, वॉटर बॅग, कपडे, मिष्टान्न जेवण, असे विविध उपक्रम संघटनाने राबविले आहेत. इतर आदिवासी पाड्यामध्ये देखिल जाऊन असे उपक्रम राबवत असते. यावेळी संघटनाचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव- गौरव कोचर,कोष्याध्यक्ष- अभय ब्रम्हेचा, शुभम राखेचा, सद्स्य आकाश जैन, विपुल छाजेड,रोटरीचे अध्यक्ष चेतन टाटीया, विभागीय उपाध्यक्ष लतीश जैन, तसेच लहान मुलांना परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणून मोक्षिता जैन, वस्तीगृहांचे चेअरमन महेश शिरसाठ यांच्यासह समाजतील अनेक विद्यार्थी हजर होते.