जळगाव (प्रतिनिधी) भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS)च्या तर्फे 19 मे रोजी जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात एक डझन नवनीत वही, एक स्कूल बॅग, कंपास बॉक्स, लंच बॉक्स, पाणी बॉटल, असा संपूर्ण सेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य या कार्यक्रमाचे फलित होते. हा कार्यक्रम धुळे जळगाव नंदुरबार या संयुक्त जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. त्यामुळे समाजात एकीकरणाची भावना सुद्धा दिसून आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश भावसार उर्फ पपडी पहीलवान जळगाव हे होते. ह.भ.प. भरत मार्तंड बरहाटे महाराज, अरुण रामप्रसाद भावसार अमळनेर, सुभाष झेंडू भावसार (धरणगाव), धुळे समाज अध्यक्ष गोपीचंद जानकीराम पांडव आणि कार्यकारणी तसेच जळगाव पिंपळा समाज अध्यक्ष पंडित उत्तमसेठ भावसार आणि कार्यकारणी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. संस्थेचे अध्यक्ष कैलास भावसार (नंदुरबार) यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जळगाव टीम मधील निता भावसार यांनी सूत्रसंचालन केले. देविदास भावसार, प्रवीण सिताराम भावसार, भावेंद्र भावसार, गिरीश भावसार (सर) यांनी अतिशय मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
















