भुसावळ (प्रतिनिधी) ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने सिद्धगुरु नित्यानंद स्वामी यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त निंभोरा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वही, पाटी, कंपास तसेच पंचमुखी हनुमान कवचाचे वितरण करण्यात आले. यानंतर सर्वांना भाजी, पोळी, श्रीखंड यांचा समावेश असलेल्या भोजनाचा आनंद घेता आला.
सिद्धगुरु नित्यानंद स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी राबवला जातो समाजोपयोगी उपक्रम
गणेशपूरी, मुंबई येथे स्वामींची समाधी असून, तेथे दररोज चालणाऱ्या बालभोजन उपक्रमाच्या धर्तीवर प्रतिष्ठानतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याच परंपरेनुसार या वर्षी निंभोरा खुर्द येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जोशी, क्रांती ढाके, करुणा जोहरे, तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. नितू पाटील, डॉ. रेणुका पाटील, राहुल माळी, राम शेटे, विवेक पाटील, चेतन झोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य रिद्धी फेगडे, चिरंजीव वेदांत, चिरंजीव दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे, मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी, मनोज गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम प्रतिष्ठानने राबवला.