धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा आज धरणगाव तालुका व धरणगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा बँकेच्या चेअरमन संजय पवार यांचा आज भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, शिरीष बयस, अॅड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, अॅड.वसंतराव भोलाने, युवानेते चंदन पाटील, कन्हैया रायपूरकर, कैलास माळी, ललित येवले, कमलेश तिवारी, पुनीलाल महाजन, कडू बयस, सचिन पाटील,विशाल पाटील, भूषण कंखरे, कल्पेश महाजन यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.