जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सर्वपक्षीय पॅनलकडून मुक्ताईनगर तालुका प्राथमिक विकास सहकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथराव खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा बँक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी आतापर्यंत ३२२ अर्ज दाखल केले असून, आजच्या चौथ्या दिवशी मुक्ताईनगर तालुका प्राथमिक विकास सहकारी सोसायटी मतदार संघातून एकनाथराव खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे–खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, सुचक असलेले अतुल युवराज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.