TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरक्षा भेदून आंतरराष्ट्रीय कॉल्स प्रकरण : जळगाव कनेक्शनची चौकशी होणार?

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क प्रा. लि. या कंपनीने आंतरराष्ट्रीय कॉल बायपास करुन ते स्थानिक कॉल दाखविले. यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या तसेच टाटा टेलीकम्युनिकेशन कंपनी आणि भारतीय दूरसंचार कंपनीला करोडो रुपयांचा चुना लावला. तसेच यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, संबंधित कंपनीचे राज्यात अनेक ठिकाणी नेटवर्क आहे. एवढेच नव्हे तर संशयित आरोपीचे जळगाव कनेक्शनही समोर आल्यामुळे चौकशी होणार का?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

लोकमत, दिव्य मराठी आणि सकाळ या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या खासगी कंपनीच्या कार्यालयावर ८ जूनरोजी छापा टाकला होता. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजरला अटक केली असून सन्नी मुर्गेसन देवेंद्र (रा. अंधेरी, मुंबई) असे अटकेतील आरोपी मॅनेजरचे नाव आहे. तर महाडेश्वर अर्जुन देवेंद्र (रा. अंधेरी मुंबई) आणि नादेर अली हुसेन अली जयराज (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी दोघा इतर आरोपींची नावे आहेत.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

याप्रकरणात तिघांविरोधात छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. २०२१ मध्ये शहर सायबर पोलिसांनी एका नेटवर्क कंपनीच्या ४५ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यातील आरोपींसोबत सन्नीची भागीदारी होती. आता पुन्हा तोच या घोटाळ्यातही असल्याचे निष्पन्न झाल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शिवाय टीटीएलच्या दाव्यानुसार, अशा कॉल्सवर देशाची सुरक्षा यंत्रणा देखरेख करू शकत नाही. त्यांची ओळखदेखील पटवता येत नाही. तर आता एकाच लँडलाइनवरून अवघ्या दोन महिन्यांत या कंपनीच्या वतीने वळवण्यात आलेले कॉल्स अमेरिका आणि अखाती देशात करण्यात आलेल्या तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतल्याचे कळते.

सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क कंपनीने सेटअप तयार करून आयएलडी परवानाधारक गेट वे बायपास करून ५३ हजार ७०३ आंतरराष्ट्रीय बेकायदा कॉल्स फिरवल्याने खळबळ उडाली आहे. आता सायबर पोलिसांची टीम मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयाची तपासणी करणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कंपनीचे गेल्या वर्षभरातील सीडीआर मागवणार असल्याचे कळते.

टाटा टेलिकम्युनिकेशन कंपनीचे व्यवस्थापक धनंजय दत्तात्रय यादव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडला टीटीएलने त्यांना एसआयपी ट्रंक (सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल) (रिअल कॉलिंग मेन्टेन आणि टर्मिनेट करणारी कार्यप्रणाली, ज्यातून इंटरनेटच्या माध्यमातून कॉल करता येतो.) देण्यासाठी डॉटद्वारे अनिवार्य केलेल्या कागदपत्राची पडताळणी व इतर आवश्यक अटी शर्थीनुसार सेवा देण्यासाठी करार केलेला आहे व त्यानुसार सेव्हन स्टार कंपनीला ०२४०- ६७३०००० ते २४०६७३०९९९ असे जवळपास एक हजारावर क्रमांक ‘टीटीएल’कडून केवळ कार्यालयीन वापरासाठी दिले होते. ते ३१ जानेवारी २०२२ रोजी सक्रिय करण्यात आले होते. त्यानंतर सेव्हन स्टार कंपनीने एसआयपी ट्रंक वापरण्यास सुरुवात केली.

सेव्हन स्टार कंपनीकडून बेकायदेशीपरणे सेटअप करून आयएलडी परवानाधारक गेटवे बायपास करून आंतरराष्ट्रीय कॉल्स बेकायदेशीरपणे स्थानिक व एटीडी म्हणून वापरात आणले. त्यासाठी विदेशातून येणारे आयएसडी कॉल्स हे स्थानिक कॉल दाखविण्यात आले. विशेष म्हणजे, उत्पन्नावर परिणाम होत असल्याच्या तसेच संशयास्पद हालचाली आढळून आल्याने ‘टाटा’च्या रेव्हेन्यू टीमने १० कॉलची पडताळणी केली असता, हे कॉल विदेशातून आल्याचा प्रकार उघड झाला. यामुळे उत्पन्नावरील परिणामासोबतच राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचल्याची खात्री होताच ‘टाटा’ कडून डॉटला कळविण्यात आले. दरम्यान डॉटनेही २९ मे रोजी टाटाला फिर्याद देण्यासंदर्भातील मेल पाठविल्यानंतर सायबर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.

संशयित आरोपीचे जळगाव कनेक्शन?

सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क हे जळगाव जिल्ह्यातही इंटरनेट सेवा पुरवते. तर संभाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी सन्नी मुर्गेसन देवेंद्र (रा. अंधेरी, मुंबई) असे अटकेतील आरोपी मॅनेजरचे नाव आहे. तर महाडेश्वर अर्जुन देवेंद्र (रा. अंधेरी मुंबई) आणि नादेर अली हुसेन अली जयराज (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे विविध वृतांमधून समोर आले आहे. दरम्यान, एका संशयिताचे जळगाव कनेक्शन असल्याची चर्चा आहे. त्या संशयितासोबत नंदुरबार येथील एकाच्या नावाने भागीदारी करार असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी सेव्हन स्टारच्या मुंबईतील मुख्यालयासह इतर ठिकाणीही चौकशी केल्याचे कळते. त्यामुळे जळगावातही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विदेशातून आयपी अॅड्रेस हॅक हा सर्व प्रकार झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षतेच्या दृष्टीने पोलीस सर्व बाजूने तपास करण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये दहशतवादी संघटना अल कायदानं सेंट्रल रेल्वेच्या पर्सनल डिपार्टमेंटच्या भुसावळ डिव्हिजनशी निगडीत ही इंडियन रेल्वेच्या वेबसाईटवरची एक मायक्रोसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

अभिमानास्पद : चोपडा तालुक्यातील तरुण शास्त्रज्ञाचा चंद्रयान-3 मोहिमेत सहभाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माळी समाज पंच मंडळातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा सत्कार

June 9, 2021

हृदयद्रावक : तीन वर्षांच्या चिमुकलीला रेल्वेतून बाहेर फेकत विवाहितेची आत्महत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 9, 2022
fraud red round stamp

आ. चंद्रकांत पाटलांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे लाचखोर विमा प्रतिनिधीस अटक !

June 14, 2021

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

September 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group