जळगाव (प्रतिनिधी) उमेदवारीबाबत घेतलेले आक्षेप पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फेटाळून लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद सभागृहात जोरदार वाद झाल्याचे वृत्त आहे.
महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाआधीच अॅड. सुचीता हाडा यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. मात्र जिल्हाधिकार्यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. त्यामुळे सभागृहात वाद झाल्याचे कळते. दुसरीकडे जयश्री महाजन, प्रतिभा कापसे यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडी प्रसंगी प्रसारमाध्यमांना सभागृहात येऊ न दिल्यामुळे अधिकचा गोंधळ निर्माण झाला आहे. सभागृहात नेमकं काय सुरु आहे?, याबाबत काहीही माहिती मिळत नाहीय.