TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तात्यासाहेब आणि बाबासाहेब यांचे अपूर्ण राहिलेले काम पुर्ण करा : पी.डी.पाटील

महापुरुषांना जाती - जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका : रविंद्र गजरे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे गावात आधुनिक भारताचे जनक, क्रांतीसुर्य, सत्यशोधक – महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सयुंक्त जयंतीमहोत्सव निमित्त साखरे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व साकरे ग्रामस्थांच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यान पुष्पचे आयोजन करण्यात आले.

या गुरु शिष्य जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक रोहिदास भास्कर सोनवणे यांनी करून वक्त्यांचा परिचय करून दिला. या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी साकरे गावाचे पोलीस पाटील घनश्याम पाटील होते. व प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व इंग्लिश मिडीयम स्कूल, एरंडोल चे आदर्श शिक्षक रवींद्र गजरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धानोरा चे सरपंच भगवान महाजन, शिवसेना उपतालुका प्रमूख मोतीलाल आप्पा पाटील, मोतीराय आप्पा, साखरेचे सरपंच शरद पाटील, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील, मोतीलाल पारधी, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे, सुभाष सोनवणे, भिका भोळे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते व मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

कार्यक्रमाचे वक्ते पी.डी.पाटील यांनी प्रथम पुष्प गुंफतांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व बाबासाहेबांचा म्हणजेच गुरू – शिष्यांचा जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विशद केले. बाबासाहेबांनी लहानपणी जातिभेद सोसला, पाण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानत रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृति ग्रंथाचे दहन केले. बाबासाहेबांचे गुरु तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले होते. छत्रपती शिवराय ते भिमराय यातील दुवा म्हणजे तात्यासाहेब होय. आजच्या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पहावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे दुसरे पुष्प प्रमुख वक्ते रवींद्र गजरे यांनी आजचा समाज व युवा पिढीचा नोकरीसाठी होत असलेला संघर्ष, वास्तवता, बेरोजगारी, ढासळत चाललेली शिक्षणव्यवस्था, जाती – जाती, धर्मा – धर्मांमध्ये लावले जाणारे तेढ अशा विविध विषयांवर विस्तृत असे मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी या महापुरुषांचा आदर्श विचार घेऊन मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन गजरे यांनी केले.

या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गौरव बिऱ्हाडे, अजय पानपाटील, आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, समाधान संदांनशिव, समाधान सोनवणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती साकरे, साकरे गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, व समस्त साकरे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन अनमोल सहकार्य केले. या जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन उदय मोरे तर आभार भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार निलेश पवार यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

धरणगावजवळ भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार ; दोन गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एसटी बसची दुचाकीला धडक ; तरुण जागीच ठार !

August 13, 2023

चोपडा : आंतरराज्य बॉर्डर मीटिंग, जळगाव पोलीस अधीक्षकांनी साधला ग्रामस्थांसोबत संवाद !

March 28, 2024

महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 15, 2024

भुसावळ : साकेगावात महिलेचा चाकूने भोसकून खून !

September 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group