जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संघटनांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन या पूर्ण सप्ताहात करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धा मधील विजेते व उपविजेते या सर्व संघांना व वैयक्तिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रथम, द्वितीय तृतीय विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभ कांताई सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रदीप तळवलकर, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त व स्पोर्ट्स हाऊसचे संचालक फारूक शेख, नाशिक निवडणूक विभागाचे तहसीलदार व एकलव्य पुरस्कार प्राप्त हंसराज पाटील, आंतरराष्ट्रीय पदक विजेता व एकलव्य क्रीड़ा पुरस्कार प्राप्त मार्क धरमाई यांच्या विशेष उपस्थितीत हा महिलांचा गुणगौरव समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी तर सूत्रसंचालन क्रीड़ा अधिकारी सुजाता गुल्हाने व आभार फारूक शेख यांनी मानले.
कार्यक्रमात यांनी केले मार्गदर्शन
महापौर जयश्री महाजन यांनी उपस्थित क्रीडापटूंना आपल्या कर्तृत्वाची जाण करून दिली व आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आपण पुरुषांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाची सूत्रे मी स्वतः हातात घेऊन कार्य करीत आहे. तहसीलदार हंसराज पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थिनीने, महिलेने आपला मतदानाचा हक्क बजावा यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आव्हान केले. कांचन चौधरी यांनी सुद्धा आपल्या मनोगताद्वारे खेळाडूंनी आपल्या क्षेत्रात सातत्य व चिकाटी ठेवली तर आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही असे आपले स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केले.
विशेष सत्कार मूर्ती
शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील व आयशा मोहम्मद एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती दिशा पाटील, २६ जानेवारी दिल्ली येथे महाराष्ट्र एनसीसी समाविष्ट झालेली मोक्षदा चौधरी व सोनाली पाटील योगाच्या राष्ट्रीय प्रशिक्षक संगीता पाटील यांचा उपस्थितांच्या हस्ते शाल, समूर्ति चिन्ह व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य
क्रीड़ा संचालिका प्रो डॉ अनिता कोल्हे, आर्बिटर प्रवीण ठाकरे, क्रीड़ा शिक्षिका कांचन नारखेडे, जयश्री माळी, मीना सपकाळे, डॉक्टर कांचन विसपुते, चारुशीला पाटील, माधुरी गोखले, विद्या कलंत्री, जयश्री भंगाळे, दीप्ती चौधरी व सरस्वती दाते यांचे सहकार्य मिळाले म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार स्पोर्ट्स हाउस व क्रीड़ा विभागातर्फे करण्यात आला.
खेळाडू व संघास ट्रॉफी व मेडल
व्ययक्तिक स्पर्धेतिल सर्व प्रथम तीन क्रमांक पटकविनारे खेळाडूना व सांघिक खेळत विजयी व उपविजयी संघास स्पोर्ट्स हाउसतर्फे चषक तर क्रीड़ा अधिकारीतर्फे प्रमाणपत्र एकूण ११२ महिला खेळाडूंना देण्यात आले.