मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना संजय राऊतांच्या कुटुंबियांची वाईन व्यावसायिकांबरोबर पार्टनरशीप असल्याचं किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. सोमय्या यांची मुले चणे, शेंगदाणे किंवा अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा थेट सवाल करत संजय राऊत यांनी केला आहे.
एखादा व्यवसाय करणे गुन्हा किंव पाप आहे का? असा सवाल करत जर आमच्या वायनरी असतील तर किरीट सोमय्या यांनी त्या ताब्यात घेऊन चालवाव्यात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच, कोणाची मुले काय करतात हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. सोमय्या यांची मुले चणे, शेंगदाणे किंवा अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा थेट सवाल करत संजय राऊत यांनी केला आहे.
आज काही भाजपची थोंडी लोकं सांगत आहेत की, आमच्या वायनरी आहेत. जर आमच्या वायनरी असतील तर त्या मी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे करुन द्यायला तयार आहेत. त्यांनी त्या खुशाल घ्याव्या आणि चालवाव्यात. भाजपच्या लोकांनी अशा प्रकरारचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. हे त्यांच्यावर उलटणार, तुम्ही आमच्या कुटुंबापर्यंत आलेत, मात्र तुमच्या सारखी आमची मुलं ड्रग्ज विकत नाहीत. भाजपच्या किती लोकांच्या वाईनरी आहेत ते पाहा. तसेच वाईन विक्रीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचेही संजय राऊत म्हणाले.
किरीट सोमय्या काय म्हणाले होते?
सोमय्या म्हणाले होते की, आरोप करत नाही तर पुराव्यासह दाखवतो. राऊत कुटुंबियांचे वाईन उद्योजकासोबत करार झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला. याबाबतची काही कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली होती.