मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्री मलायका अरोराचा वयाच्या ४८व्या वर्षी देखील जलवा कायम आहे. पण सध्या सोशल मीडियावर मलायकाला ट्रोल केले जातंय. मलायका तिच्या पाळीव श्वानाला घेऊन नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने राखाडी रंगाची ट्रॅक पँट आणि जॅकेट घातले होते. तसेच तोंडाला डबल मास्क देखील लावले होते. दरम्यान मलायकाने ब्रा न घातल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मलायका तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती कधी योगा करताना दिसते तर कधी जीममध्ये वर्कआऊट करते. नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कही लावले होते. पण तिने ब्रा घातली नव्हती. तिचा असा हा ‘विदाऊट ब्रा’ लूकमधला फोटो एका फोटोग्राफरने काढला आणि तो फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि झालं… मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली.
ट्रोलर्सचं मत काय?
मलायकाच्या या व्हायरल फोटोवर अनेक वेगवेगळ्या कमेंट पहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘डबल मास्क विदाऊट ब्रा!’ दुसरा म्हणतो, ‘तुला ब्रा घालायला आवडत नाही का?’ तिसऱ्याने म्हटलंय, ‘मी पैसे देतो तू ब्रा विकत घे.’ चौथा म्हणतो, ‘काय निर्लज्ज बाई आहे ही ब्रा पण नाही घालत’, अशा कमेट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय.
















