जळगाव (प्रतिनिधी) श्रीराम माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दि. १४ एप्रिल २०२१ बुधवार रोजी सकाळी ९ वाजता साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी होते तर प्रमुख अतिथी दिनेश पाटील व भगवान लाडवंजारी होते. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन व गुलाब पुष्प अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करताना बाबासाहेबांचे सामाजिक कार्य , राष्ट्रीय कार्य व भारतीय राज्यघटना लिहिण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान याविषयी ऑनलाईन माहिती ५ वी ते १० वी चा विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती भाषणाच्या माध्यमातून ऑनलाईन सांगितली.
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या विषयावर ५ वी ते १० वीचा विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा ऑनलाईन आयोजित केली होती. यात १ प्रथम क्रमांक नंदिनी पाटील ९ वी ब द्वितीय क्रमांक प्रशांत सोनवणे ९ अ तृतीय क्रमांक निकिता गिरीश अटवाल ७ वी चतुर्थ क्रमांक पूजा सुनील पाटील ९ वी ब आला. या विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाकर जोशी व प्रमुख अतिथी दिनेश पाटील, भगवान लाडवंजारी यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे आभार संजय बडगुजर यांनी मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरस्वती पाटील, संनो पिंजारी, संगीता कुलकर्ण, अतुल चाटे, कर्मचारी धनंजय सोनवणे, विनोद इखे यांनी परिश्रम व सहकार्य केले.