जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील प्रतिथयश,नामांकित फॅमिली डॉक्टर व्ही. आर. कुलकर्णी (वय 89)यांचे वृध्दापकाळाने ठाणे येथे निधन झाले.
डॉक्टर व्ही. आर. कुलकर्णी यांच्या पश्चात पत्नी, ठाणे येथील विवेक व अतुल कुलकर्णी ही दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते ओरियन शाळेतील शिक्षिका धनश्री नांदेडकर यांचे वडील तर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी चंद्रवदन नांदेडकर यांचे सासरे होत.