बोदवड (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.गीता प्रविण पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
डॉ.गीता पाटील यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, ॲड. प्रकाशचंद सुराणा, सर्व संचालक तसेच प्राचार्य, प्राध्यापक अरविंद चौधरी उपप्राचार्य, डॉ. व्ही. पी. चौधरी, डॉ. चेतनकुमार शर्मा व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.