जळगाव (प्रतिनिधी) आज हॉटेल सिल्वर पॅलेस येथे डॉक्टर मोईज देशपांडे यांना आयुष इन्टरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे खान्देश गौरव पुरस्कार-२०२१ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी डॉक्टर मोईज देशपांडे यांच कौतुक केलं.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रसन्नता व्यक्त केली. या कार्यक्रमाला जळगाव महानगर पालिकेचे महापौर जयश्री महाजन उपस्थित होते. डॉक्टर मोईज देशपांडे हे बी. ए. एम. एस. असून मेहरूण परिसरात त्यांचे हॉस्पिटल आहे. परिसरातील आणि खेड्यातील लोकांना अगदी सवलातीच्या दरात येथे उपचार देत आहेत. डॉक्टर मोइज देशपांडे हे रेड प्लस ब्लड बँकेचे चेअरमन ही आहेत. एका आयुष विद्यार्थ्याने संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन ब्लड बँक सारखा समाज उपयोगी उपक्रम राबवणे हे कौतुकास्पद आहे. या ब्लड बँकेने कोरोना काळात जेव्हा जळगावात रक्त पुरवठ्याची कमतरता भासत होती तेव्हा अथक प्रयत्नांनी रक्तसाठा उपलब्ध करून दिला. तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा प्लाझ्मा अथक प्रयत्न करून उपलब्ध करून दिला.
गरीब व गरजू लोकांसाठी कार्यरत
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदतकक्षाचे डॉक्टर मोईज देशपांडे हे मार्गदर्शक असून या केंद्रामार्फत गोरगरिबांना आरोग्य सेवा देतात व आरोग्य मार्गदर्शन करतात. डॉ. देशपांडे हे आरोग्य सेवा मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन सुद्धा आहेत. तसेच सामाजिक व आरोग्य क्षेत्रात आघाडीचे प्रयत्न करत असतात.