कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नुरुद्दीन मुल्लाजी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेंगलूर (मद्रास) येथील गोल्डन केअर क्लब यांच्या सौजन्याने आजीवन कर्तुत्व पुरस्कार (DR. BR AMBEDKAR LIFETIME ACHIEVEMENT AWARD) देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय पत्रकार महासंघ यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रवीण भाऊ बाविस्कर, मौलाना आझाद विचार मंच शहराध्यक्ष आरिफ पेंटर, त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य अर्तजा मुल्लाजी आदींनी त्यांचा सत्कार केले. याप्रसंगी प्रतिक जाधव (जवखेडे), नितीन ठक्कर (एरंडोल), गणेश कोळी (उत्राण), शेख मुश्ताक (रजा केबल), हेमराज जनार्दन चौधरी (फरकांडे), किशोर चौधरी, दीपक शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.