भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेररोड वरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टॉफ यांना दीनदयाल नगर मधील चार इसमांनी चाकूचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुरुवारी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.स्वनिल राजाराम कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.१२ ऑक्टोबर) रोजी रात्री ७.५५ वाजेपासून ते २१ ऑक्टोबर रोजीचे रात्री ८ वाजेच्या दरम्यान जामनेर रोडवरील कोळंबे हॉस्पिटल येथे इसम नाव कलिम शेख (रा. दीनदयाल नगर), संदीप (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांचे इतर दोन अनोळखी साथीदारांनी फिर्यादीच्या हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्यादी व स्टॉफला चाकूचा धाक दाखवून मला ५० हजार प्रतिमहिना खंडणी मागून शिवीगाळ करून खंडणी न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच हॉस्पिटलमधील फोनवर तुमको हॉस्पिटल चलाना है की नही?, कलीम शेख बात कर रहा हू. तुमको मुझे हर महिना ५० हजार रुपये देणे पडेगे. नही तो तुमको जान से मार डालुंगा, अशी जिवेठार मारण्याची धमकी दिली. म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्या आदेशानुसार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ९०१/२०२० भा.द.वि.कलम ३८७,५०४, ५०६,५०७,३४, ३,२५,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.