धरणगाव (प्रतिनिधी) येथील आज जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते डॉ.सिद्धांत मिलिंद डहाळे यांनी नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये डी एम प्रवेशासाठी भारतातून ४० व्या क्रमांक व उत्तर महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सत्कार करतांना जळगाव लोकसभेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख व सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे संचालक संजय सावंत यांचे धरणगावात जोरदार फटाक्यांची आतषबाजी स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, पि.एम.पाटील उपस्थित होते. अक्षय मुथा यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. विनोद रोकडे यांचा धरणगांव परीट धोबी समाजाचे युवक अध्यक्ष म्हणून निवडी बद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी चर्मकार महासंघाचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, अहमद पठान, अजय चव्हाण, सुरेखा महाजन, आराधना पाटील, मंदा धनगर, उज्ज्वला पारेराव, राजेंद्र ठाकरे,करण वाघरे ,हेमंत चौधरी, धिरेंद्र पुरभे, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, सतिश बोरसे, नगराज पाटील,काल शेख, राहुल रोकडे यांच्याहस आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे, आभार लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व विलास पवार यांनी मानले.