जळगाव (प्रतिनिधी) डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुगलमीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी व्यासपीठावर डॉ.पी.आर.सपकाळे, डॉ.एस.सी.तायडे, प्रा.कुशल ढाके, प्रा.प्रविण देवरे, प्रा.यशोदिप पवार उपस्थीत होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ.एस.सी.तायडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमोच सूत्रसंचालन सागर पोखरकर याने तर आभार प्रथमेश गांमुर्डे यांने मानले.