TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती संभाजीनगरात २५० कोटींचे ड्रग्ज जप्त ; गुजरात पोलिस, डीआरआयची धडक कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखा, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पुणे, तब्बल २३ किलो कोकेनसह ७.४ किलो मेफेड्रोनचा साठा जप्त केल्यामुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईत पथकाने जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई पटेल (४५, रा. गोलवाडी) आणि संदीप शंकर कुमावत (४०, रा. वाळंज) या दोघा आरोपींना अटक केलीय.

गुजरात डीआरआय पथकाने पैठण लिंक रोडवरील कांचनवाडी येथील फ्लोरेन्झा व्हिलाज येथे जितेश कुमार याच्या निवासस्थानी धाड टाकून तपासणी केली असता, त्याच्या घरातून तब्बल २३ किलो कोकेनचा साठा मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पथकाने ३० लाखांची रोकड व इतर साहित्य असा २५० कोटींचा साठा जप्त केला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

गुजरात येथील जीएसटीच्या डीआरआय पथकाला गुजरात येथून छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती हाती लागली होती. त्यामुळे त्या पथकाने पुण्यातील पथकाला सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील पैठण लिंकरोडवर असलेल्या फ्लोरेन्झा व्हिला सोसायटीत १९ क्रमांकाच्या बंगल्यात शनिवारी (दि. २१) छापा टाकला. जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई पटेल यास ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २३ किलो कोकेन जप्त केले. तसेच पैठण एमआयडीसीमधील महालक्ष्मी इंडस्ट्रीज नावाचा कारखाना हा मेफेड्रोन आणि केटामाईनच्या उत्पादनात गुंतलेला असल्याच्या माहितीवरून या ठिकाणी पथकाने तपासणी केली असता, ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन आणि सुमारे ९.३ किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त केले. रोख ३० लाख रुपये जितेश पटेलच्या घरातून जप्त करण्यात आले. या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाचे बेकायदेशीर बाजार मूल्य हे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

जप्त केलेले हे सर्व पदार्थ एनडीपीएस कायदा १९८५ च्या संबंधित तरतुदीनुसार जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह दोन जणांना एनडीपीएस कायद्यांच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत पथकाने जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई आणि संदीप शंकर कुमावत या दोघा आरोपींना अटक केली आहे. डीआरआयचे उपसंचालक राहुल निगवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

खळबळजनक : परळीत गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025

फायरब्रॅड नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश ; राहुल गांधींनी केले स्वागत !

December 20, 2023

फडणवीसांचा मास्टर प्लान? राज्यात पुन्हा युतीची चर्चा

November 6, 2022

मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने थांबवण्यासाठीच हा लॉकडाऊन : चंद्रकांत पाटील

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group