गोंदिया (वृत्तसंस्था) आईसोबत असलेले अनैतिक संबंध ठेवणाऱ्या गवंडी मिस्त्रीचा एका १६ वर्षांच्या मुलाने काठीने मारून खून केल्याची खळबळजनक घटना गोंदिया तालुक्याच्या बघोली येथे घडली. सुनील देवदास बांते (वय ४०, रा. चांदोरी खुर्द), असे मृताचे नाव आहे. तर त्याचा खून करणारा विधी संघर्षित मुलगा हा १६ वर्षांचा आहे.
चांदोरी खुर्द येथील सुनील बांते हा आपल्या सोबत गवंडी कामावर बघोली येथील एका विधवा महिलेला नेत होता. ती विधवा असल्याने कामावरच या दोघांचे अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे सुनील आता त्या महिलेच्या घरी येत होता. ही गोष्ट विधवा महिलेच्या मुलाला खटकायला लागली होती. तशात सुनील बांते हा नेहमी प्रमाणे १ जुलै रोजी कामावरून घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे बघोली येथे गेला. बघोली येथे खूप दारू पिली. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास तो घरी जायला निघाला. परंतु तो चांदोरी खुर्द गावाच्या २०० मीटर अंतरावरच त्याच्या डोक्यावर काठीने वार करून १६ वर्षाच्या मुलाने त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. श्वान पथक मागवले. त्यानंतर गावात चौकशी केली. यातून विधवा आईसोबत चार वर्षांपासून अनैतिक संबंध असल्यामुळे १६ वर्षीय विधी संघर्षित मुलाने हा खून केल्याचे उघड झाले. मृतक हा विधवा महिलेकडे नेहमीच जात असल्याने विधी संघर्षित मुलाने मृतकाला महिनाभरापूर्वी संबंध तोडण्याबाबत ईशारा दिली होता. परंतु मृतकाने त्याच्या धमकीला न जुमानता आपला प्रयोग सुरूच ठेवला होता. त्यामुळेच खून केल्याचे विधी संघर्षित मुलाने कबूल केले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे.