चोपडा (प्रतिनिधी) मागील अनेक दिवसांपासून संतधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. दरम्यान, दि. ५ आगस्ट रोजी मध्यरात्रीच्या वेळेस माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे जुने घर देखील कोसळले आहे.
मध्यरात्री १ ते २ च्या सुमारस महादेव मंदिराच्या समोरील ७० ते ७५ वर्ष जुने बांधकाम असलेले तीन मजली इमारत जीर्ण झालेली असल्याने अचानक जमीनदोस्त झाली. या जुन्या घरात आता मात्र कोणाचे ही वास्तव्य नव्हते. पंरतु दिवसा या घरात ये-जा सुरू असते. येणारे- जाणारे पादचारी व मंदिरात दर्शनासाठी आलेला भाविक हे सहज माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या जुन्या घराच्या ओट्यावर बसून राहत होते. त्यामुळे दिवसा ही घटना झाली असती तर विपरीत घडलं असते. परंतु रात्री ही घटना झाल्याने मात्र कोणतेही हानी झाली नाही. इतकेच नव्हे तर अंगणातील एक झाड होते त्याला देखील काही एक धक्का न लागल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु सकाळ पासूनच बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती. जवळपास ७० ते ७५ वर्ष जुने घर होते.