बुलडाणा (वृत्तसंस्था) चिखली तालुका व परिसरात शनिवारी सायंकाळपासून अवकाळी पावसाने झोडपले. रविवारी सकाळी येथे वादळवाऱ्यासह गारपीट झाली. तालुक्यातील झाडाखाली थांबलेल्या मजुराच्या भालगाव अंगावर झाड कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर श्रीपाद चव्हाण (रा. भालगाव) असे मृताचे नाव आहे.
भालगाव येथील ज्ञानेश्वर चव्हाण हे रविवारी सकाळी शिवसिंगपूर तुकाराम परिहार यांच्या शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, ढगाळ वातावरण असताना अचानक वादळवारा सुरू झाला आणि गारपिटीसह पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाच्या बचाव व्हावा म्हणून शेतात असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेतला. दरम्यान जोरदार वादळ येऊन आंब्याचे झाड मुळासकट जमिनीवर कोसळले. काही काळाच्या आतच ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या अंगावर झाड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अवकाळी पावसाने यंदा राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.