रावेर (प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालय रावेर येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी, सॅनीटायझर व मास्क खासदार रक्षाताई खडसे यांचे कडून स्वखर्चाने पुरविण्यात आली आहे. तसेच कोविड सेंटर व लसीकरण केंद्रात रुग्ण व लसीकरणास आलेल्या नागरिकांशी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची माहिती घेतली. तसेच ऑक्सिजन सुविधेविषयी माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, प. स. सभापती कविताताई कोळी, गोपाळ नेमाडे, माधुरीताई नेमाडे, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, यु.मो.ता उप अध्यक्ष अजिंक्य वाणी, योगिता वानखेडे, सुनिल पाटील, महिला आघाडी ता. अध्यक्षा रेखा बोंडे महिला आघाडी ता. सरचिटणीस जयश्री पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी,जितेंद्र पाटील, मनोज श्रावक, प्रल्हाद पाटील, शुभम पाटील,बाळा आमोदकर, उमेश महाजन, अरुण शिंदे, गणेश मराठे, तहसिलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, उप गटविकास अधिकारी सोनवणे, डॉ.पवन पाटील, डॉ. महाजन, डॉ. पाटील आदी उपस्थित होते.