बोदवड (प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी खासदार रक्षाताई खडसे यांचे कडून स्वखर्चाने पुरविण्यात आली आहे. तसेच कोविड लसीकरण केंद्रात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी यांना खासदार रक्षाताई खडसे यांनी योग्यत्या सूचना केल्या.
यावेळी ता. अध्यक्ष प्रभाकर पाटील, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, तालुका उपाध्यक्ष भागवत चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, तालुका सरचिटणीस राजू डापसे, अमोल देशमुख, शहर सरचिटणीस अमोल शिरपुरकर, तालुका बुथ संपर्क प्रमुख दिलीप घुले, तहसीलदार घोलप साहेब, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, गटविकास अधिकारी नागतीलक साहेब, पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड, अतुल दबंग, राम आहुजा, उमेश गुरव, नानकराम आहुजा, डॉ.अमोल पवार, अमोल गिरी, शिल्पा शर्मा, कल्याणी चौधरी इ. पदाधिकारी उपस्थित होते.