नांदुरा ता. बुलढाणा (प्रफुल्ल बिचारे) येथील शिवसेना नेते भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा तालुक्यामध्ये विविध समाजपयोगी कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी समाजातील वंचित घटकाला मदतीचा हात देण्यात आला.
या कार्यक्रमात शेंबा परिषद शाळेवर शालेय साहित्य वाटप तसेच डिघी येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेत पुस्तक वाटप, दहिगाव येथील आश्रम शाळेवर वृद्ध लोकांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप तर नांदुरा येथील रेल्वे स्टेशनवर अनाथ लोकांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. वाटप करताना नांदुरा तालुक्यातील बरेच शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संतोष डिवरे, सुनील भाऊ जुनारे, नंदू भाऊ खोंदले, अनिल जांगडे, सुभाष गवळी, संतोष लाहुडकार, विष्णू घनोकार, गजानन करांगडे, रवी इटखेळे, जितु मोरे, अर्जुन तांगडे, पंडित बिचारे, संदीप पाटील, बाळू पाटील राम पांडव, भिकाजी गायकवाड, सचिन पाटिल, सुरेंद्र चौधरी, नीना पाटील, महादेव काळे, प्रभाकर शिंगोटे, आशोक हिवराळे, मिलिन हिवराळे, नरहरी लांडे, विठ्ठल लांडे, बाळू डोफे, जितेंद्र सपकाळ, सचिन चव्हाण, किशोर वाकोडे, राजेंद्र इंगळे, सचिन कल्याणकर, जितेंद्र सपकाळ, महादेव सपकाळ, देवेंद्र जयस्वाल, संजू संभाजी वसे यांच्यासह आदी शिवसैनिक हजर होते.
















