मुंबई (वृत्तसंस्था) माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजताच दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या सुद्धा सोबत होत्या. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची ईडीकडून तब्बल साडे सहातास चौकशी झाली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
काल सकाळी एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या देखील ईडी कार्यालयात दाखल झाल्या. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहार हा शारदा खडसे यांच्या नावावर आहे. त्यामुळे शारदा खडसे यांची सुद्धा चौकशी करण्यात आली. एकनाथ खडसे यांच्यावर पदाचा दूरउपयोग करून व्यवहार केल्याचा आरोप आहे. तर आर्थिक व्यवहाराबद्दल शारदा खडसे यांच्यावर आरोप आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांची साडे सहातास कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या कन्येचीही चौकशी करण्यात आली. या चौकशी नंतर संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारे खडसे ईडी कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मीडियाने त्यांना गराडा घातला असता खडसे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रं आणि इतर माहितीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहीन. ईडीला सर्व सहकार्य करणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, आजच्या चौकशीत काय काय विचारणा करण्यात आली, हे सांगणं त्यांनी टाळलं. ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे मी हजर राहिलो. यापूर्वी दोनवेळा भोसरी जमीन प्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. अँटिकरप्शन ब्युर, आयकर विभाग आणि जोटिगं कमिटीने सखोल चौकशी केली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, असं सांगतानाच ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी पुन्हा बोलावलेलंही नाही, असं खडसे म्हणाले.
खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा ४० कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जातं. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचं सांगतिलं जातं.
मध्यंतरी, भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी वकिलामार्फत कोर्टात दिली. त्यामुळे ते ED च्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असंही सांगण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आला होता. गेली १४ दिवस मुंबईत उपचार घेतल्यानंतर अखेर एकनाथ खडसे हे ईडीच्या चौकशीला सामोरं गेले आहे.