जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थान पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ईडीच्या अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला १५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. नवल किशोर मीना असं ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव आहे. या कारवाईमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
इडीचे अधिकारी चिटफंड प्रकरणात अटक न लाख रुपयांची मागणी करत होते. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी नवल किशोर मीना उर्फ एनके मीना आणि त्याचा सहकारी बाबूलाल मीना उर्फ दिनेश यांना तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी जयपूरमध्ये अटक केली. नवल किशोर हा मूळचा बस्सी जिल्ह्यातील विमलपुरा गावचा रहिवासी असून त्याचा न सहकारी बाबुलाल हा कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये इम्फाळ (मणिपूर) येथील ईडीच्या कार्यालयाचे अंमलबजावणी अधिकारी (ईओ) नवल किशोर मीना आणि त्याचा स्थानिक सहकारी बाबूलाल मीना यांचा समावेश आहे. इम्फाळच्या ईडी कार्यालयात नोंदवलेल्या चिटफंड प्रकरणात आरोपी अधिकारी नवल किशोर मीना याने प्रकरण मिटविण्यासाठी, मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी १७ लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेसाठी कुटुंबाला त्रास देण्यात येत होता, अशी तकार तक्रारदाराने केली होती.